Rabbi Pik Vima- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम ही 2016 पासून राज्यांमध्ये राबविण्यात आलेली एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024 करिता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून पुढील पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
योजनेच्या प्रमुख बाबी
विमा पात्र शेतकरी कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे ई. सर्व शेतकरी विमा संरक्षित बाबी: नैसर्गिक आपत्तींपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, नुकसान भरपाई राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित. चालू वर्षांचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय. \”Rabbi Pik Vima Yojana Maharashtra \”
पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीस संरक्षण विमा हप्ता व सबसिडीः किफायतशीर विमा हप्ता. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ताः विमा संरक्षित रक्कमेच्या 1.5%, नगदी व व्यापारी पिकांसाठी 5%.
रब्बी पिक विम्याची प्रमुख वैशिष्ट्ये खाली देत आहोत,
- रब्बी हंगामातील पिकांसाठीच हा विमा लागू असेल.
- नैसर्गिक आपत्ती, किड व रोग यांपासून पिकांचे संरक्षण.
- शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक असेल.
- शेतकऱ्यांसाठी खूप कमी दरात प्रिमियम.
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा यात दिली जाते.
पिक विमा म्हणजे काय ते आपण प्रथम जाणून घेऊयात.
“पिक विमा” म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे विमा संरक्षण, जो त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत पुरवतो. पिक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देतो.
पिक विम्याचे मुख्य उद्दीष्ट
- पिकांना झालेल्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे, विशेषत: अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ, रोग, कीड अशा इतर नैसर्गिक आपत्ती.
- शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवून देणे.
- पिक विमा योजना शेतकऱ्यांना कमी प्रीमियमच्या दरात उपलब्ध करून देणे, ज्याच्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते.
पिक विम्याचे प्रमुख प्रकार जाणून घेऊयात.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)- ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, ज्यात विविध प्रकारच्या पिकांना विमा दिला जातो.
- राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS)- काही विशिष्ट पिकांसाठी असलेल्या विमा योजनेचा प्रकार.
- राज्यस्तरीय विमा योजना- वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.
पिक विमा कसा काम करतो ते इथे बघुयात?
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विमा नोंदणी करणे गरजेचे असते.
- शेतकऱ्यांना विम्याचा प्रीमियम थोड्याफार प्रमाणात भरावा लागतो.
- पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर आणि ते चेक केल्यानंतरच विमा रक्कम दिली जाते.
पिक विमा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना अनिश्चिततेच्या काळात आर्थिक अडचणीतून वाचवते.
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत रब्बी पिकांसाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख साधारणपणे १५ डिसेंबर असते. प्रत्येक पिकाची कट ऑफ तारीख जिल्ह्याच्या पीक दिनदर्शिकेवर आधारित असते.
Rabbi Pik Vima 2024 Application Process
रब्बी पिक विमा भरण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील.
सुरुवातीला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर फार्मर कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करा.
तिथे गेल्यानंतर लॉगिन फॉर फार्मर वर क्लिक करा.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करून लॉगिन करा.
त्यानंतर आपला apply for insurance वर क्लिक करा रब्बी पिक विमा योजनेचा फॉर्म उघडेल.
फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर फॉर्म चा preview पहा काही चूक झाली असेल तर दुरुस्त करा.
शेवटी पेमेंट करून, Rabbi Pik Vima 2024 Application Form Submit करा.
जर तुम्हाला स्वतःहून रब्बी पिक विमा योजनेचा फॉर्म भरता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रावर देखील जाऊन रब्बी पिक विमा 2024 भरू शकता.
0 टिप्पण्या