Marathi Tech

Marathi Tech

करा ड्रॅगॉन फ्रुट ची शेती आणि कमवा लाखो Dragon fruit Framing

 शेतकऱ्यांचा ( Farmers ) कल आता आधुनिक शेतीकडे ( modern agriculture ) वाढतोय. कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरत असलेल्या ‘ड्रॅगन फ्रुट’ची ( Dragon fruit ) अलीकडच्या काळात मोठी चर्चा होऊ लागली. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे.


 ड्रॅगन फ्रुटची मागणी सध्या बाजारात वाढली आहे. कमी कष्टांत बक्कळ पैसा ( lot of money with less effort ) देणाऱ्या या फळाची शेती किती फायदेशीर ( profitable ) आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 



शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारची फळे आणि भाज्या यांचेही उत्पन्न घेऊ लागलेत. यामध्ये त्यांना चांगला नफाही मिळतो. इतर फळांप्रमाणेच ड्रॅगन फ्रुटची लागवड भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे. ड्रॅगन फ्रुटची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. याची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल. यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, त्या ठिकाणी सुद्धा हे फळ चांगले वाढते. ड्रॅगन फ्रुटचा वापर जॅम, आईस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये केला जातो. फेस पॅक मध्ये ते वापरले जाते. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.


ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर एका हंगामात किमान तीन वेळा फळ येते. एका फळाचे वजन साधारणपणे 400 ग्रॅम पर्यंत असते. एका झाडाला किमान 50-60 फळे येतात. या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फ्रुटची फळे मिळण्यास सुरुवात होते. मे-जून महिन्यात याला फुले येतात, आणि डिसेंबर महिन्यात फळे येतात. साधारणपणे दोन ड्रॅगन फ्रुट रोपांमधील अंतर दोन मीटर असावे. तुमच्याकडे सुमारे एक हेक्टर जमीन असेल, तर तेथेही तुम्ही सहज लागवड करू शकता. सुरुवातीच्या काळात तुम्ही या झाडांना लाकडी किंवा लोखंडी काठीचा आधार देत वाढण्यास मदत करू शकता. ही झाडं 50 सेमी x 50 सेमी x 50 सेमी आकाराच्या खड्ड्यात लावा, जेणेकरून त्यांची चांगली वाढ होईल. यामधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकजण नोकरी सोडून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. एक एकर शेतीतून दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी सुरुवातीच्या काळात चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील. या शेतीत पाण्याची फारशी गरज नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यावर जास्त खर्च करावा लागत नाही, त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या