हिंगोल शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्यावी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर Crop insurance
हिंगोली : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2022 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 14 जुलै, 2022 रोजी कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा कृषि विकास अधिकारी निलेश कानडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सांवत, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी साईप्रसाद उल्हारे, सर्व तालुका कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शूरंस कंपनी जि. पुणे यांच्यामार्फत खरीप हंगाम 2022 मध्ये प्रधान मंत्री पीक विमा राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते.
हे पण वाचा मंडळी:-महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना 2022: ऑनलाइन अर्ज करा | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA
या महिन्यात जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि सहायकामार्फत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व तात्काळ सर्व्हे सुरु करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंन्शूरंस ऑपवर, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळवावे.
नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी सांगितले.
Benefits
Pradhan Mantri Fasal Bima Yojana
- Insurance protection for food crops, oilseeds and annual horticultural/commercial crops notified by state government.
- Uniform maximum premium for all farmers:
- Kharif season - 2% of sum insured.
- Rabi Season 1.5% of sum insured.
- Annual commercial/horticultural crops - 5% of sum insured
हे पण वाचा मंडळी ....
SARKARI YOJANA
- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना 2022: ऑनलाइन अर्ज करा | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA
- पिक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू हिंगोली|crop loan application
- अशी करा pik pahani app वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online
- महा शरद पोर्टल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया|Maha Sharad Portal Registration
- वैयक्तिक शौचालय अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | sauchalay online registration 2022
- How To Get Aadhar PVC Card Onlile ||५० रुपयांत घरपोच मिळवा तुमचे PVC आधार कार्ड; जाणून घ्या प्रोसेस ||
- PM-Kisan सम्मान निधी eKYC कशी करायची |PM-Kisan Samman NIdhi kashi karayachi?
5 टिप्पण्या
Good work
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाNice job bro
उत्तर द्याहटवाPik vima kas bharayach bhau
उत्तर द्याहटवाCSC var bar bhau
हटवा