नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे
याच्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 2350 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.आणि याच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पाहण्यासाठी CSC (सीएससी) चे पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे.
आता यानंतर याची पुढील प्रक्रिया का असणार आहे आपल्या खात्यात कसे पन्नास हजार रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे अशा सर्व प्रश्नांचा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे.तर शेतकरी मित्रांनो आता हीच सर्व माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जमा केली जाणार आहे ?
तर शेतकरी मित्रांनो 27 जुलै 2022 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आपण जर पाहिलं तर जी कर्जमाफीची प्रक्रिया यापूर्वी राबवण्यात आलेली होती.
ज्याच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्यानंतर आपली यादीत नाव असल्यास आपल्या विशिष्ट क्रमांकावरून किंवा आधार नंबर वरून आपली बायोमेट्रिक केवायसी पूर्ण करावी लागत होती.
याचप्रमाणे आता याद्या प्रकाशित झाल्यानंतर पात्र यादीत नाव असेल तर शेतकऱ्यांना Agriculture Loan केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. ही केवायसी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.याचे नियम व निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत.
Agriculture Loan शेतकऱ्यांनी यादीत नाव कसे पहावे ?
तर शेतकरी मित्रांनो या याद्या प्रकाशित झाल्यानंतर या याद्या तुम्हाला फक्त सीएससी(CSC) च्या अधिकृत वेबसाईटवर या याद्या पाहता येणार आहेत.याशिवाय तुम्हाला या याद्या दुसरीकडे कुठेही पाहता येणार नाहीत.
या यादीत नाव असेल तर तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करून या पन्नास हजार रुपये पुरस्कार अनुदानाचा लाभ घेऊ शकाल.
0 टिप्पण्या