Marathi Tech

Marathi Tech

केंद्र सरकारची भन्नाट योजना! PM-Suryghar yojana ‘प्रधानमंत्री- सूर्यघर’साठी ‘इथे’ अर्ज करा, पुन्हा वीजबिल येणारच नाही; ३० ते ७८ हजार रुपयांची सबसिडी apply

सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणार 78 हजार रुपये अनुदान



‘प्रधानमंत्री- सूर्यघर’ मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी (सवलत) मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ‘महावितरण’ला दिल्या आहेत.

👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणान्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम बसविणान्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित आहे. 

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल अॅपही यासाठी उपलब्ध आहे.

👇👇👇👇

गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर | find your land/farm

1880 पासून जुने सातबारा फेरफार पहा! Old 7/12

– लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण

१) एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते.

२) महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे.

३) दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.

१३ फेब्रुवारीनंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे.

२० फेब्रुवारीपर्यंत राज्यात रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १,२७,६४६ असून त्यांची वीजनिर्मिती क्षमता १९०७ मेगावॅट झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या