Marathi Tech

Marathi Tech

करा कळ्या तांदळाची शेती कमवा लाखो रु| Rice Farming

BLACK RICE FARMING

तांदळाच्या विविध प्रकारच्या जातीचे उत्पादन घेण्यात येते. मात्र आता आजारावर प्रभावी, औषधी गुणधर्म असलेल्या काळ्या तांदळाची शेती करून शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात. होय, काळा तांदूळ… या तांदळाची जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सध्या आपल्या बाजारात उपलब्ध असलेल्या तांदळाची किंमत साधारण: ४० ते २०० रुपये प्रति कि लो आहे. मात्र काळा तांदूळ ५०० रुपये प्रति किलो भावाने विकलो जातो.           

     

code


कशी करायची शेती?

काळ्या तांदळाच्या लागवडीसाठी मे महिना सर्वात चांगला मानला जातो. सर्वात प्रथम रोपे तयार केली जातात. याला तयार होण्यासाठी एक महिना लागतो. त्यानंतर तयार झालेली रोपे शेतात लावली जातात. सामान्य तांदळाच्या शेतीच्या तुलनेत काळ्या तांदळाच्या शेतीला अधिक वेळ लागतो. रोपे लावल्यानंतर जवळपास पाच ते सहा महन्यिांनंतर पीक कापण्यासाठी तयार होते. याची रोपे सहा फुटांपर्यंत वाढतात.



औषधी गुणांमुळे महत्व


काळ्या तांदळामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट आणि ॲथोसायनिन असतात, काळ्या भातांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. हृदयासंबंधी आजारांमध्ये ते फायदेशीर असून, डायबिटीज आणि कॅन्सरवर परिणामकारक आहे. प्रोटीन आणि आयर्न मुबलक प्रमाणात असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग
होत असल्याने या तांदळाला देश विदेशात मागणी असते.




काळ्या तांदळाला परदेशातही मागणी


फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईसची लागवड केली जात होती. भारतामध्ये ब्लॅक राईस उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे या तांदळाला मोठ्या शहरात व परदेशात चांगली मागणी आहे. मोठ्या शहरात काळा तांदूळ किमान तीनशे रुपये ते चारशे रुपये किलो दराने विकला जातो. अमेझॉनसारख्या ऑनलाईन साईटवरही या तांदळाची विक्री केली जाते.

बि घेण्यासाठी येथे क्लिक करा..........
Black rice Farming, BLack rice beneifits
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या