पीक विमा योजना 2023 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | PM Pik Vima 1 Yojana in Maharashtra
1 रुपयात पिक विमा योजना
सर्व समावेशक पीक योजना खरीप व रब्बी हंगाम शेतकरी मित्रानो आपल्या राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिला अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलेला होता, या सन 2023 24 चा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या होत्या. यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मध्ये पिक विमा काढता येणे, शेतकऱ्यांनी पिक विमा काढताना येणारा खर्च आता भरायचा नसून केवळ एक रुपया भरावाचा आहे उर्वरित सर्व शेतकऱ्याला Pik Vima भरावयाची रक्कम महाराष्ट्र शासन भरणार आहे.
एक रुपयात पिक विमा देण्याची घोषणा झालेली होती परंतु अद्याप शासन निर्णय प्रकाशित झालेल्या नसल्यामुळे ही योजना राज्यांमध्ये सुरू झालेली नव्हती. परंतु आता या योजनेचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय हा प्रकाशित झालेला असून संपूर्ण राज्यात सर्व समावेशक असणारी ही pik vima in 1 rupees योजना आता सुरू झालेली आहे.
1 रुपयात पिक विमा योजना शासन निर्णय जाहीर :
2023 24 चा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केल्याप्रमाणे ही योजना राज्यामध्ये सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 23 जून 2023 रोजी जारी करण्यात आलेला आहे. शासन निर्णय जारी करून शेतकरी बांधवाना एक रुपया पिक विमा देणाऱ्या येणाऱ्या योजनेला मंजुरी मिळालेली आहे.
एक रुपयात पिक विमा योजनेचा शासन निर्णय येथे पहा
कशी असेल नवीन एक रुपयात पिक विमा योजना?
महाराष्ट्र राज्यात पूर्वी ज्याप्रमाणे पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येत होती. त्याचप्रमाणे ही नवीन पिक विमा योजना आहे पूर्वीच्या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. फक्त शेतकल्याना पिक विमा काढण्यासाठी यापूर्वीची रक्कम भरावी लागत होती ती आता भरायची आवश्यकता नसून शेतकऱ्याचे हिश्याची रक्कम महाराष्ट्र शासन अनुदान म्हणून भरणार आहे.
अश्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकन्याच्या एष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी ही एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून देणारी योजना आता सुरू झालेली आहे...
0 टिप्पण्या