Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र गृह विभागाने नुकताच पोलीस भरती 2022 साठी नव्याने भरती जीआर जारी केला असून त्यात महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेचा उल्लेख केला आहे. या जीआरनुसार, प्रथम शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा / चाचणी घेतली जाईल.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम.
क्रमांक - सेप्रनि-१८१८/प्र.क्र.३१३(भाग-२)/पोल-५अ.—महाराष्ट्र पोलीसअधिनियम (१९५१ चा मुंबई अधि.२२) याच्या कलम५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याच्या वतीने त्यास समर कर्थणाऱ्या सर्वइतर अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्रशासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मध्येआणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत :-
१. या नियमास, "महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम, २०२२" असेम्हणावे.
२. "महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ४ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल :
01 ) शारीरिक चाचणी : शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे
पुरुष उमेदवारासाठी
* 1600 मीटर धावणे 20 गुण
* 100 मीटर धावणे 15 गुण
* गोळाफेक 15 गुण
महिला उमेदवारासाठी
* 800 मीटर धावणे 20 गुण
* 100 मीटर धावणे 15 गुण
* गोळाफेक 15 गुण
असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल
2- लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील
लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :
* अंकगणित
* सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
* बुद्धिमत्ता चाचणी
* मराठी व्याकरण
हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी 90 मिनिटे असेल,
संपूर्ण जीआर वाचनासाठी-- येथे क्लिक करा
4 टिप्पण्या
Kharach ka
उत्तर द्याहटवाMahit nahi
हटवाSuper
उत्तर द्याहटवाKharach honar ka
उत्तर द्याहटवा